Breaking News

भारतीय पुरुष संघाचा स्पेनवर दणदणीत विजय

अँटवर्प (बेल्जियम) : वृत्तसंस्था

‘ड्रॅगफ्लिकर’ हरमनप्रीत सिंग याच्या दोन गोलमुळे भारतीय पुरुष हॉकी संघाने बेल्जियम दौर्‍यातील दुसर्‍या सामन्यात जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या स्पेनवर 6-1 असा दणदणीत विजय मिळवला. हरमनप्रीत (28व्या आणि 32व्या मिनिटाला), कर्णधार मनप्रीत सिंग (24व्या मिनिटाला), निळकंठ शर्मा (39व्या मिनिटाला), मनदीप सिंग (56व्या मिनिटाला) आणि रुपिंदरपाल सिंग (59व्या मिनिटाला) यांनी भारतासाठी गोल केले.गुरजित कौर हिने अखेरच्या मिनिटाला केलेल्या शानदार गोलमुळे भारताने ग्रेट ब्रिटनवर 2-1 अशा फरकाने मात केली. शर्मिला देवी आणि गुरजित यांची कामगिरी भारताच्या विजयात मोलाची ठरली. ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ग्रेट ब्रिटनविरुद्धच्या पाच सामन्यांच्या हॉकी मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply