
खालापूर : प्रतिनिधी
दिलासा फाऊंडेशन आणि पत्रकार संघाच्या वतीने चौक येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात खालापूर तालुक्यातील गुरुजनांचा पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, ज्येष्ठ व्यंगचित्रकार भरत सावंत, शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास पत्रकार बाबू पोटे, गुरुनाथ साटेलकर, दिनेश पाटील, अर्जुन कदम व पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.