Breaking News

वर्ल्डकपआधी टीम इंडियाची नवी जर्सी लाँच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

वर्ल्ड कप 2019 ला 100 पेक्षाही कमी दिवस राहिले आहेत. अशा वेळी भारतीय क्रिकेट टीमची अधिकृत किट पार्टनर असलेल्या छळज्ञशने टीम इंडियाची नवी जर्सी लाँच केली आहे. वर्ल्ड कप 2019 मध्ये टीम इंडिया हीच जर्सी घालून मैदानात उतरेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या हैदराबाद वनडे सिरीज आधीच्या पहिल्या मॅचपासून कॅप्टन कोहली आणि एमएस धोनी टीम इंडियाच्या या

जर्सीचे अनावरण केले आहे.

कोहली आणि धोनी यांच्यासोबत महिला टीमच्या हरमनप्रीत कौर आमि जेमिमा रॉड्रिगेज या देखील या वेळी उपस्थित होत्या. याव्यतिरिक्त अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ देखील या लाँचिगवेळी उपस्थित होते. गेल्या 10 वर्षातील छळज्ञशची ही बेस्ट जर्सी असल्याचे या वेळी कॅप्टन कोहलीने सांगितले.

कपिल देवच्या नेतृत्वात खेळणार्‍या टीम इंडियाने 1983 मध्ये सफेद जर्सीमध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. या प्रेरणेतून महेंद्रसिंग धोनी आणि टीमने 2007 आणि 2011 मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या निळ्या जर्सीत हा किताब जिंकला. भारतीय टीमच्या जर्सीचा वारसा आता पुढे दिला जात आहे. ही जर्सी आम्हाला मिळालेल्या वारशाची आठवण करून देते. प्रत्येक संघाशी खेळणे आणि सर्व प्रकारात नंबर वन पोहोचणे या प्रेरणादायी तत्त्वाशी ही जर्सी जोडली असल्याचे एम. एस. धोनीने या वेळी सांगितले. नवी जर्सी ही वर्ल्ड कपचा भाग बनेल याची आशा आहे, पण आम्हाला आमच्या सातत्यावर गर्व असल्याचेही तो या वेळी म्हणाला.

Check Also

खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयाला ’नॅक’ची ए श्रेणी प्राप्त

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर …

Leave a Reply