Breaking News

सामाजिक उपक्रमांमुळे मिळालेल्या शुभेच्छा आयुष्यात महत्त्वाच्या -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
आपण वाढदिवसाला सामाजिक उपक्रम राबवून सेवा करतो त्याबद्दल समाज आपले आभार मानतो आणि या शुभेच्छा आपल्या आयुष्याला महत्त्वाच्या ठरतात, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर विविध योजनांच्या कार्ड वाटप कार्यक्रमावेळी केले. या वेळी त्यांनी पुस्तक भेट देऊन माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांना वाढदिवसाच्या
शुभेच्छा दिल्या.
पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांच्या वाढदिवसानिमित्त खारघरमधील नागरीकांना ई-श्रम कार्ड आणि आयुष्मान भारत कार्ड वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत तसेच माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय आणि भाजप नेते अमर उपाध्याय यांच्या माध्यमातून 63 महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात आले होते. या महिलांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून नागरीकांना ई श्रम कार्ड, आयुष्मान भारत कार्ड आणि महिलांना प्रमाणपत्राचे वाटप करून हर्षद उपाध्याय यांनी राबवलेल्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चिटणीस ब्रिजेश पटेल खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक नरेश ठाकूर, गुरुनाथ गायकर, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, हर्षदा उपाध्याय, सरचिटणीस दीपक शिंदे, भाजप नेते वासुदेव पाटील, समीर कदम, अमर उपाध्याय, युवा मोर्चाचे खारघर शहर अध्यक्ष नितेश पाटील, मधूमिता जिना, शामला सुरेश, रजनी शर्मा, गायत्री दुबे आदी उपस्थित होते.

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply