

पनवेल ः रामप्रहर वृत्त
आदिमाया आदिशक्तीचा नवरात्रोत्सव उत्सव मोठ्या उत्साहात सर्वत्र सुरु आहे. त्यानिमित्त पनवेलमधील मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने झंकार नवरात्र उत्सव 2019 आयोजित करण्यात आला आहे. त्याअंतर्गत सोमवारी या सुरु असलेल्या उत्सवात परिसरातील दांडिया प्रेमींनी दांडिया आणि रास गरबाचा आनंद घेतला. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्तम नृत्य करणार्यांना बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. पनवेलमधील मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्रोउत्सव साजरा करण्यात येतो. यंदा झंकार नवरात्रोत्सवाचे हे 13वे वर्ष असून, दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मोठ्या उत्साहात झंकार नवरात्रोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त सुमित झुंजारराव, निशांत पावसकर, रोशन ठाकूर, प्रितम म्हात्रे, अपूर्व प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी झंकार नवरात्रोत्सवाला भेट दिली.