पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय मजदूर संघ (बीएमएस) रायगड युनिटच्या वतीने व जेएनपीटी जनरल कामगार संघटना व जेएनपीटी वर्कर्स युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने जेएनपीटी टाऊनशीप हॉलमध्ये नुकतीच राष्ट्रीय श्रमिक दिनानिमित्त विश्वकर्मा जयंती, विश्वकर्मा पूजन व कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला.
या वेळी जेएनपीटी जनरल कामगार संघटनचे व भारतीय मजदूर संघ (बीएमएस) रायगड अध्यक्ष व राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश पाटील जेएनपीटी वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी व कामगार विश्वस्त रवी पाटील, जेएनपीटी जनरल कामगार संघटनचे जनरल सेक्रेटरी जनार्दन बंडा, ज्येष्ठ कामगार नेते मधुकर पाटील, दिनेश साखरे, भारतीय मजदूर संघाचे तालुका अध्यक्ष लंकेश म्हात्रे, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्रीयुत नुरा शेख व सर्व कामगार उपस्थित होते.
या वेळी भारतीय मजदूर संघ रायगडचे ज्येष्ठ नेते राम भगत व जेएनपीटीचे कामगार उपस्थित होते. श्री. पाटील भाषणात म्हणाले की, संघटनेच्या बर्याच वर्षानंतरच्या मागणीनुसार हा सरकारने 17 सप्टेंबर हा राष्ट्रीय कामगार दिन जाहीर करावा, तसेच आम्ही तळागाळाच्या सर्व कामगारांना न्याय मिळवून देऊ. त्यानंतर रवी पाटील म्हणाले की, बीएसमएसच्या तत्त्वानुसार आम्ही सर्व कामगारांना न्याय हक्कांच्या ज्या मागण्या असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, तसेच अध्यक्षीय भाषणात राम भगत म्हणाले की, कामगारांनी चमक, धमक किंवा भपकेबाजीला भुलून न जाता रवी पाटील व सुरेश पाटील यांचे नेतृत्व मजबूत केले पाहिजे, जेणेकरून तळागाळाच्या सर्व कामगारांना न्याय मिळेल.