Breaking News

एमएनएम विद्यालयाचे कराटे स्पर्धेत यश

पनवेल ः रामप्रहर वृत्त

कराटे चॅम्पियनशीप आयोजित सामन्यात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या एमएनएम विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले. या सामन्यात वेगवेगळ्या विभागातून अनेक विद्यालयांनी आपला सहभाग नोंदवला होता. एमएनएमच्या 77 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता व यशही संपादन केले. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  विद्यालयाचे कराटे प्रशिक्षक प्रकाश सूर्यवंशी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभाले. संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर यांनी व विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, मुख्याध्यापिका नम्रता न्यूटन यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

Check Also

वीर वूमन्स फाउंडेशनकडून वडाळे तलाव स्वच्छतेसाठी 12 डस्टबिन

पनवेल : रामप्रहर वृत्तवडाळे तलाव पनवेलचा केंद्रबिंदू असून हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, …

Leave a Reply