Breaking News

बोरघाटात तीन वाहनांचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू

खोपोली : प्रतिनिधी

बोरघाट उतरताना बुधवारी (दि. 2) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास खोपोली बायपास रस्त्यावरून शीळफाट्याकडे येणार्‍या कंटेनरचे मिळगाव येथील उतारावर ब्रेक निकामी झाले. त्यामुळे अनियंत्रित झालेल्या कंटेनरने पुढील एक टेम्पो व ट्रकला जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात ट्रक उलटल्याने ट्रकमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. पुण्याकडून खोपोलीमार्गे मुंबईकडे जाणार्‍या कंटेनरचे घाट उतारावर ब्रेक निकामी झाले. सदर कंटेनर मिळगाव येथील तीव्र उतारावर पूर्णपणे अनियंत्रित झाला. या कंटेनरने एक टेम्पो व ट्रकला धडक दिली. यात ट्रक पलटी झाला तर टेम्पो महामार्गाखाली उतरून डोंगराच्या कपारीत शिरला. यात ट्रक व टेम्पोचे प्रचंड नुकसान झाले. उलटलेल्या ट्रकमधील एकाचा मृत्यू झाल्याचे सकाळी निदर्शनास आले. या अपघाताची नोंद खोपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply