पेण : प्रतिनिधी
येथील नगर परिषदेतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत बुधवारी (दि. 2) महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता हीच सेवा मोहीम राबविण्यात आली. या वेळी पेण शहरातील आरटीओ कार्यालय ते भोगावती नदीपर्यंत श्रमदान करून रस्त्याच्या कडेला पडलेला प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला, तसेच नगर परिषद कार्यालय परिसराची स्वच्छता करण्यात आली. या वेळी प्लास्टिकमुक्त पेण शहर, असा संदेशही देण्यात आला. नगराध्यक्षा प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष दीपक गुरव, मुख्याधिकारी अर्चना दिवे, स्वच्छता अभियान शहर समन्वयक विशाल सकपाळ, आरोग्य निरीक्षक दयानंद गावंड, शिवाजी चव्हाण, अंकिता इसाळ यांच्यासह नगरपालिकेचे सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचार्यांनी या स्वच्छता अभियानामध्ये श्रमदान केले.