Breaking News

तोतया व्यक्ती उभी करून जमिनीची विक्री

माणगावात 10 आरोपींवर गुन्हा दाखल

माणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील कोस्ते गावामधील एका महिलेच्या नावे असलेल्या जमिनीचा व्यवहार करताना 19 मार्च 2016 रोजी माणगाव दुय्यम निबंधक कार्यालयात तोतया महिलेला उभे करून त्या जमिनीची विक्री करण्यात आली. या प्रकरणी वर्धन वसंत भावे (45, रा. पुणे) यांनी फिर्याद दिल्यानंतर 10 आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील आरोपी संतोष बळीराम मोर (रा. हरवंडी, ता. माणगाव), दिनेश नथुराम गुगले (रा. निळगुण, ता. माणगाव), विजय लहू पाटील (रा. तांबडशेत, ता. पेण), विजय नथुराम शेडगे (रा. चाच, ता. माणगाव), प्रकाश यशवंत पवार (रा. खरवली, ता. माणगाव), महेंद्र रामचंद खैरे (रा. पाणोसे, ता.  माणगाव), विनायक सखाराम साळुंखे (रा. कडापूर, ता. माणगाव), नंदू नथुराम मानकर (रा. चाच, ता. माणगाव), तोतया अनुसया उर्फ अनुराधा वसंत भावे (रा. पुणे), तोतया वर्धन वसंत भावे (रा. पुणे) यांनी संगनमताने फिर्यादी वर्धन वसंत भावे यांच्या आईच्या नावे असलेली मौजे कोस्ते येथील (सर्व्हे नं. 109/1 क्षेत्र 0-40-0, सर्व्हे 110/1 क्षेत्र 2-00-0) जमीन फिर्यादी यांच्या आईच्या मूळ आधारकार्ड आणि खोट्या सत्यप्रतिज्ञालेखाचा वापर करून संतोष बळीराम मोरे (रा. हरवंडी ता. माणगाव) यांना अखत्यारपत्राद्वारे दिली आहे, असे खोटे भासवले आणि ते अखत्यारपत्र खरे आहे असे दाखवून 19 मार्च 2016 रोजी माणगाव दुय्यम निबंधक यांच्यासमक्ष खरेदी खत केले. सदर जमीन ही नयन प्रमोद खताते (रा. खांदा कॉलनी, पनवेल), अशोक मनीलाल दंड (रा. मुलुंड, मुंबई) यांना आठ लाख 75 हजार रुपयांना विकली. पुन्हा तीच जमीन दिनकर त्रिंबक पाटील (रा. हमरापूर, ता. पेण) यांना आठ लाख 80 हजार रुपयांना खोटे दस्त सादर करून विकली. या गैरव्यवहारप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 193 (2), 199, 200, 420, 465 अन्वये आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक फौजदार जितेंद्र वाटवे करीत आहेत.

Check Also

नवी मुंबई विमानतळाला ‌‘दिबां‌’चे नाव द्या; भाजपचे लक्षवेधी आंदोलन

पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी …

Leave a Reply