खोपोली : प्रतिनिधी
स्वच्छ भारत अभियानांतर्गत खोपोली नगरपालिकेने प्लास्टिकमुक्त खोपोलीसाठी कंबर कसली आहे. यासाठी मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्लास्टिक संकलनासाठी तीन केंद्रे उभारली. खोपोली गावात दीपक हॉटेल चौक, एसटी बस डेपो, तसेच शिळफाटा येथील रमाकांत हॉटेलसमोर अशी ही केंद्रे प्लास्टिक संकलन करतील. यासाठी प्रत्येक केंद्रावर दोन जणांची नियुक्ती त्याचप्रमाणे एकूण 14 घंटागाड्यांवर प्लास्टिक संकलनासाठी अतिरिक्त एक कर्मचारी देण्यात आला आहे.