Breaking News

एनएमएमटीच्या ताफ्यात पहिली इलेक्ट्रिक बस दाखल

उरण ः रामप्रहर वृत्त

महानगरपालिका परिवहन उपक्रमास केंद्र शासनाकडून 30 इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध होणार आहेत. यामधील पहिली बस उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाली असून पुढील एक महिन्यात या बसेस प्रत्यक्ष रोडवर धावणार आहेत.

महानगरांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाने इलेक्ट्रिक बसेसचा जास्तीत जास्त वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई महानगर पालिकेलाही शासनाच्या योजनेमधून 30 बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी 40 टक्के शासनाचा व 60 टक्के महापालिकेचा निधी वापरण्यात येणार आहे. एनएमएमटीच्या ताफ्यात एक बस आली आहे. उर्वरित बसेसही 15 दिवसांमध्ये उपलब्ध होणार आहेत. आरटीओ पासिंग केल्यानंतर त्यांचा प्रत्यक्ष वापर करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या योजनेमधून 30 इलेक्ट्रिक बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. 15 दिवसांत सर्व बसेस उपलब्ध होतील. यानंतर आरटीओ पासिंग करून घेतल्यानंतर प्रत्यक्ष बसेस सुरू केल्या जाणार आहेत.

-शिरीष आरदवाड,परिवहन व्यवस्थापक, एनएमएमटी

Check Also

‘नैना’साठी शेतकर्‍यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका

आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्‍या मुंबईच्या अनुषंगाने नैना …

Leave a Reply