Breaking News

गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

पनवेल ः रामप्रहर वृत्त

आदिशक्तीचा जागर सर्वत्र मोठ्या उत्साहात सुरू आहे. त्यानिमित्त पनवेलमधील मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने झंकार नवरात्र उत्सव 2019 आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवात परिसरातील दांडियाप्रेमींनी दांडिया आणि रास गरबाचा आनंद बुधवारी घेतला. या वेळी भाजप प्रभाग क्रमांक 19च्या वतीने आयोजित केलेल्या इको फ्रेंडली गणपती डेकोरेशन स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला.

या स्पर्धेतील विजेत्यांना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. पनवेलमधील मिडलक्लास सोसायटी मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्रोउत्सव साजरा करण्यात येतो. यंदा झंकार नवरात्रोत्सवाचे हे 13 वे वर्ष असून, दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही मोठ्या उत्साहात झंकार नवरात्रोत्सव साजरा होत आहे. या वेळी गणेशोत्सवादरम्यान भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 19च्या वतीने आयोजित केलेल्या इको फ्रेंडली गणपती डेकोरेशन स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला. या स्पर्धेमध्ये पाच दिवसांच्या गणरायाची पर्यावरण पूरक आरास करण्यात आलेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक चंद्रकांत खांडालकर, द्वितीय क्रमांक अनिमेश ओझे, वृषाली भाणु यांनी, तर तिसरा क्रमांक आभा जोशी यांनी पटकावला, तसेच दीड दिवसांसाठी आयोजित गणेशोत्सव स्पर्धेत नेहा डोंगरे यांना प्रथम, शैला खाडे यांना द्वितीय, अक्षया चितळे यांना तृतीय क्रमांक, तर अश्विनी खेडकर यांना विशेष बक्षीस देऊन सन्मानीत करण्यात आले. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नगरसेविका मुग्धा लोंढे, दर्शना भोईर, शहर सरचिटणीस अमरिश मोकल, युवा नेते योगेश लहाने, पवन सोनी, विजय गायकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply