Breaking News

कंटेनर रस्त्यामध्ये उभा करून ट्रेलरचालक पसार

पनवेल : बातमीदार

तालुक्यातील पळस्पे येथून काठमांडू येथे माल सोडण्यासाठी जाणार्‍या कंटेनरचालकाने मालकाने गाडी खर्चासाठी दिलेले 77 हजार रुपये घेऊन पलायन केल्याची घटना 26 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीच्या दरम्यान घडली आहे. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक श्रीजयंतीब झा (27, रा. वाशी, मूळ बिहार) यांच्या मालकीचा कंटेनर (एमएच 43-बीपी-0952) वरील चालक हा पनवेल तालुक्यातील पळस्पे येथून सिएटचा माल भरून काठमांडूला निघाला होता. या वेळी त्याचे अंतर पाहता येणारा डिझेल खर्च, तसेच त्याच्या खाण्याची व्यवस्था होण्यासाठी मालकांनी त्याच्या बँक खात्यावर 77 हजार रुपये पाठविले, मात्र या कंटेनरवरील चालक मोहम्मद अब्दुलरशिद मुस्तफा (31, दाणाबंदर, मुंबई) याने आपल्या खात्यामध्ये पैसे आल्याचे पाहून वरील कंटेनर तळोजा हद्दीतील एमआयडीसी भागातील हॉटेल बागवान समोर रस्त्यावर सोडून देऊन पसार झाला. या वेळी त्याचा संपर्क होत नसल्यामुळे कंटेनर मालक दीपक झा यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे गाठले. या वेळी तपास केला असता सदर कंटेनर तळोजा हद्दीत मिळून आला. त्यामुळे पनवेल शहर पोलीस ठाण्यात मोहम्मद अब्दुलरशिद मुस्तफा याच्या विरोधात भा.दं.वि. कलम 406 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वासराव बाबर करीत आहेत.

पनवेलमध्ये गैरसमजातून

एकाला मारहाण पनवेल येथील परदेशी आळीमध्ये राहणार्‍या एकाला कल्याण येथील चार जणांनी गैरसमजातून मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री 10.30 ते 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या वेळी झालेल्या मारहाणीत लक्ष्मण जोगेश्वरी महतो (33, परदेशी आळी, पनवेल) हे जखमी झाले आहेत. याबाबत चार जणांविरोधात पनवेल शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे. फिर्यादी लक्ष्मण महतो हे घरी रात्रीचे जेवण आटोपत असताना त्यांच्या इमारतीखाली एका महिलेचा जोरजोरात बोलायचा आवाज आला. या वेळी जेवण आटोपून ते खाली आले असता या ठिकाणी असणार्‍या कुणाल विष्णू कोट (22), अब्दुल्ला आलं शेख (22), अक्रम सुबद्री शेख (21) आणि प्रतीक्षा देवरांग गोडे (19) या चौघांनी फिर्यादी याला मुन्ना कहा है असे विचारात फिर्यादीनेच मुन्ना नावाच्या इसमास लपविले असल्याच्या गैरसमजातून या ठिकाणी असणार्‍या बांबू, प्लास्टिक पाईप, वीट तसेच पीओपीच्या तुकड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. याबाबत फिर्यादी लक्ष्मण महतो यांनी पनवेल शहर पोलिसात तक्रार दाखल केल्यानुसार पोलिसांनी या चौघांनाही ताब्यात घेतले. त्यातील तिघे जण कल्याण आंबिवली येथील, तर प्रतीक्षा गोडे ही टिटवाळा येथील असल्याचे समोर आले.   या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply