Breaking News

श्रीसदस्यांनी केला 1300 झाडांचा परिसर स्वच्छ

डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम

मुरूड : प्रतिनिधी

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे मुरूड तालुक्यात 2013 साली 1300 झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांभोवती पावसाळ्यात वाढलेल्या वेली, झुडपे कापून रविवारी (दि. 6) श्रीसदस्यांनी झाडांचा परिसर स्वच्छ केला. मुरूड तालुक्यातील कोर्लई, बोर्ली, काशीद, नांदगाव, माजगाव, आगरदांडा परिसरात 2013मध्ये डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे 1300 झाडे लावण्यात आली असून, तेव्हापासून श्रीसदस्य त्या झाडांचे संगोपन करीत आहेत. ही झाडे आता उंच व सावली देणारी झाली आहेत. या झाडांना पावसाळ्यात गवत, वेली आणि झुडपांनी वेढले होते. श्रीसदस्यांनी रविवारी सकाळी 7 वाजता कोर्लई गावातून स्वच्छता मोहीम सुरू केली व दुपारी 12 वाजेपर्यंत या सर्व झाडांच्या भोवतालचे गवत, झुडपे व वेली काढून परिसर स्वच्छ केला. या वेळी 30 टन ओला कचरा काढून डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात आला.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply