Breaking News

उरणमध्ये विद्यार्थ्यांनी केली प्लास्टिक बंदीसाठी जनजागृती

उरण ः रामप्रहर वृत्त

उरण नगर परिषदेच्या सहकार्याने शाळांनी सिंगल युज प्लास्टिक बंदीच्या विषयावरील जनजागृतीसाठी उरण शहरात रॅली काढली व प्लास्टिक बंदीचे समर्थन केले.

या वेळी एन. आय. हायस्कूलचे एनसीसी व आरे एसपी विद्यार्थी उरण नगर परिषदेच्या शाळा क्रमांक एक, दोन, तीनच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या रॅलीत प्लास्टिक बंदीचे पोस्टर घेऊन लोकांना भावतील, आशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. एन. आय. हायस्कूलचे शिक्षक एस. एस. पाटील यांनी उत्कृष्टरीत्या बसवलेल्या स्वच्छता पथनाट्याचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी चौका-चौकात केले. या रॅलीसाठी मुख्याधिकारी अवधूत तावडे, स्वच्छता अधिकारी महेश लवटे, एस. एस. पाटील, श्री. ढवळे, एनसीसीचे एस. जी. पाटील, शिव स्वामी माय नॉलेज फाऊंडेशनच्या कविता साळुंखे आदींनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply