

पनवेल : मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या झंकार नवरात्रोत्सवाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.
विजय कडू यांचा वाढदिवस

पनवेल ः दैनिक वादळवाराचे संपादक विजय कडू यांचा वाढदिवस सोमवारी उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कडू यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पत्रकार संजय कदम, सय्यद अकबर, विशाल पाटील, नीलेश सोनावणे, गणपत वारगडा आदी उपस्थित होते.
चिन्मय समेळ यांचा वाढदिवस

पनवेल ः भाजप युवा मोर्चाचे पनवेल शहर अध्यक्ष चिन्मय समेळ यांचा वाढदिवस सोमवारी उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी समेळ यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी युवा नेते मयुरेश नेतकर, अनिकेत काथारा, पवित्रा शेरावत, सतिश गमरे, तेजस जाधव, तेजस पाटील, प्रतिक नेतकर, अभिजीत जाधव आदी उपस्थित होते.
जनार्दन कोळंबेकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः खैरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जनार्दन कोळंबेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी उपसरपंच अनंता खैर, वावंजे जि. प. प्रमुख रवींद्र पाटील, प्रल्हाद केणी उपस्थित होते.