Breaking News

झंकार नवरात्रोत्सवातील विजेत्यांचा गौरव

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेलमधील मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित झंकार नवरात्रोत्सवात शेवटच्या दिवशी विजेते घोषित करण्यात आले. या विजेत्यांंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

पनवेलमधील मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा झंकार नवरात्रोत्सवाचे यंदाचे 13वे वर्ष होते. संपूर्ण उत्सवात उत्तम नृत्य करणारे झंकार मेगाविजेते सोमवारी (दि. 7) घोषित करण्यात आले. यामध्ये रिद्धी मुनोत यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून, त्यांना स्कूटी बक्षीस देण्यात आली. मीत चव्हाण यांनी द्वितीय व नेहा मालपानी यांनी तृतीय क्रमांक मिळवला. त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये दिव्यम आणि हिया शाह यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यांना सायकल बक्षीस देण्यात आली, तर राघव भट्ट, जियाना प्रजापती यांनी द्वितीय आणि शनय, तसेच पूर्वी गिड्डा यांनी तृतीय क्रमांक मिळवला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.

या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, दर्शना भोईर, नगरसेविका राजश्री वावेकर, उद्योजक राजू गुप्ते, विलास कोठारी, मंगेश परुळेकर, किरण मनोरे, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. गांधी, माजी नगरसेविका सुहासिनी शिवणेकर आदी उपस्थित होते.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply