Breaking News

पर्रीकर वैद्यकीय चाचण्यांकरिता पुन्हा गोमेकॉत

पणजी ः मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना काल सकाळी पुन्हा उपचारांसाठी गोमेकॉत आणण्यात आले आहे. पर्रीकर यांच्या काही वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. अंतर्गत रक्तस्राव चालू आहे का हे तपासण्यासाठी काही चाचण्या घेण्यात आल्या. पर्रीकर फेब्रुवारी 2018पासून दुर्धर आजाराने त्रस्त असून गोवा, मुंबई, दिल्ली तसेच अमेरिकेतही त्यांच्यावर उपचार झाले आहेत.

विविध वैद्यकीय चाचण्या घेतल्यानंतर काही वेळाने त्यांना घरी पाठविण्यात आले. सध्या त्यांच्यावर दोनापॉल येथे त्यांच्या खासगी निवासस्थानी उपचार सुरू आहेत. गोमेकॉच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व काही नियंत्रणात आहे.पर्रीकर यांना गेल्या आठवड्यात गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयात रात्रीच्या वेळी तातडीने दाखल करावे लागले होते. त्यांच्या पोटात रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे दिल्लीतील एम्स रुग्णालयातील दोन तज्ज्ञ डॉक्टरांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयात बोलावून घ्यावे लागले होते. दोन्ही डॉक्टरांनी पर्रीकर यांची पूर्ण तपासणी केली. पर्रीकर यांचा रक्तस्त्राव बंद झाला. सभापती प्रमोद सावंत यांच्या मते पर्रीकर यांना रक्ताची उलटीही झाली होती. त्याबाबतही डॉक्टरांकडून उपाययोजना करण्यात आली. प्रकृती नाजूक बनल्याने गेल्या 23 रोजी त्यांना गोमेकॉत दाखल केले होते व चार दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला होता.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply