Breaking News

मंदिरातच पुजार्याची धारदार शस्त्राने हत्या

मसूदच्या भावाची कबुली

नवी दिल्ली ः बालाकोटमध्ये भारताने केलेल्या हवाई हल्ल्यातील नुकसानीचे वृत्त पाकिस्तान सरकार आणि त्यांच्या लष्कराने नाकारले असले तरी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हवाई हल्ल्यात मोठे नुकसान झाल्याची कबुली दिली आहे. ’जैश’चा म्होरक्या मसूद अझहरचा लहान भाऊ मौलाना अम्मार याने एका ऑडिओ क्लिपमधून या वृत्ताला दुजोरा दिला आहे, मात्र या हवाई हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, असाही दावा त्याने केला आहे.

अम्मारची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यात ’मर्काज’वर बॉम्ब पडल्याचे अम्मार बोलत आहे. भारतीय लढाऊ विमानांनी ’जैश’चे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर त्याने नाराजीही व्यक्त केली. शत्रूंनी युद्ध पुकारले आहे, असेही तो म्हणाल्याचे ऐकायला मिळते.

भारताच्या हवाई हल्ल्यानंतर दुसर्‍या दिवशी पेशावरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना मौलाना अम्मारने ही कबुली दिल्याचे मानले जात आहे. भारतीय लढाऊ विमानांनी कोणत्याही एजन्सीच्या मुख्यालयाला लक्ष्य केले नाही. त्यांनी कोणत्याही मुख्यालयावर बॉम्बहल्ला केला नाही. काश्मीरमधील मुस्लिमांच्या मदतीसाठी त्यांनी आमच्या केंद्रांवर हल्ला चढवला आहे, असेही अम्मार म्हणाला.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply