Breaking News

हरित बंदर उपक्रमांतर्गत जेएनपीटीत इलेक्ट्रिक वाहने

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी

ग्रीन पोर्ट (हरित बंदर) उपक्रमांतर्गत व शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून जेएनपीटीने आपल्या प्रचालन क्षेत्रामध्ये नऊ इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू केला आहे.

जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी गुरुवारी (दि. 5) या इलेक्ट्रिक वाहनांचे उद्घाटन केले. या वेळी जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ व सर्व विभागाध्यक्ष उपस्थित होते. या वाहनांचा वापर मुख्यत: बंदराच्या प्रचालन क्षेत्रामध्ये कामगारांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी प्रवास करण्यासाठी केला जाणार आहे. जेएनपीटीने या नवीन ई-वाहनांसाठी एक डेडिकेटेड चार्जिंग स्टेशनदेखील कार्यान्वित केले आहे.

अध्यक्ष संजय सेठी म्हणाले, ई-वाहनांचा देखभालीसाठीचा खर्च कमी असून यांच्या वापरामुळे नैसर्गिक इंधनावरील खर्च व अवलंबित्व कमी होईल. ई-वाहनांचा वापर सुरू केल्याने आता जेएनपीटीचे स्थान जगातील प्रमुख कंटेनर बंदरांपैकी शाश्वत जागतिक बंदरांच्या बरोबरीचे झाले आहे. भविष्यात सुद्धा आम्ही स्वच्छ, हरित आणि शाश्वत बंदर निर्मितीसाठी प्रयत्नशील राहू.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply