नवरात्रोत्सवाच्या अखेरीस माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आदई, शिवाजीनगर, नवीन पनवेलमधील आयोजित केलेल्या नवरात्रोत्सवांना मंगळवारी भेट देऊन दुर्गादेवीचे मनोभावे दर्शन घेतले. शिवाजी नगर आणि नवीन पनवेल येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दुर्गादेवीचे दर्शन घेतले. या वेळी युवानेते साईचरण म्हात्रे, धनाजी ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते, तसेच आदई येथील श्रीकृष्ण मित्र मंडळातर्फे आयोजित नवरात्रोत्सवाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत देवीचे दर्शन घेतले. या वेळी राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्या रेश्मा शेळके, पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, युवानेते शेखर शेळके, प्रकाश शेळके, ज्ञानेश्वर पाटील, कैलास गरुडे, कैलास पाटील, जनार्दन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Check Also
पतंग महोत्सवातून मकरसंक्रात सणाचा आनंद द्विगुणित
पनवेल : रामप्रहर वृत्तमकरसंक्रांत सणाच्या औचित्याने पनवेलमधील सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने नमो उत्सव अंतर्गत सोसायटीच्या …