नवी दिल्ली : देशभरात कोविडचा संसर्ग कमी होत असल्याने गेल्या दीड वर्षापासून बंद असलेली रेल्वे प्रवासातील जेवणाची सुविधा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने याची माहिती दिली असून सोमवार (दि. 14)पासून प्रवाशांना रेल्वेतील जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, देशभरातील कोविड संबंधित निर्बंध शिथिल करण्याच्या अनुषंगाने आणि प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन भारतीय रेल्वेकडून 14 फेब्रुवारीपासून पॅन्ट्री कारसह शिजवलेल्या अन्नाची सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. रेल्वे प्रवाशांकडून जेवणाची सुविधा सुरू व्हावी, अशी मागणी रेल्वे मंत्रालयाकडे करण्यात येत होती. प्रवाशांच्या या मागणीला रेल्वे खात्याने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे प्रवाशांनी आभार व्यक्त केले आहेत.
Check Also
खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …