Breaking News

कर्जत तालुक्यात विजय संकल्प

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुका भाजपच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विजय संकल्पनिमित्त तालुक्यात बाईक रॅली काढण्यात आली. भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने

बाईकस्वार सहभागी झाले होते.

आगामी लोकसभा निवडणुकीत देशाची सत्ता पुन्हा हातात राहावी म्हणून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आणि केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी भाजप विजय संकल्प करण्यात येत आहे. यानिमित्ताने कर्जत तालुक्यात भाजप युवा मोर्चाच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण तालुकाभर भाजप विजय संकल्प रॅली काढली गेली. या रॅलीची सुरुवात कळंब येथून झाली. त्यावेळी बाईक रॅलीमध्ये भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष कल्पना दास्ताने, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, भाजप तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे यांच्यासह कर्जत नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, कर्जत युवा मोर्चा अध्यक्ष आणि संयोजक निलेश पिंपरकर, कर्जत शहर अध्यक्ष दिनेश सोळंखी यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कळंब येथे भाजप विजय संकल्प बाईक रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर ही बाईक रॅली मुरबाड-कर्जत रस्त्याने कशेळे येथे पोहचली. पुढे त्याच रस्त्याने रॅली कशेळे येथून कडाव आणि कडाव येथून पुढे कर्जत शहरात पोहचली.त्या वेळी रॅलीचे स्वागत कर्जत शहरात मोठ्या उत्साहात झाले.रॅलीमध्ये महिला प्रदेश उपाध्यक्ष कल्पना दास्ताने तसेच 50हून अधिक महिला पदाधिकारी स्वतः स्कूटरवर प्रवास करीत सहभागी झाल्या होत्या. कर्जत शहरातून बाईक रॅली भाजप पक्ष संपर्क कार्यालयात पोहचली. तेथे भारतीय जनता पक्षाच्या आगामी लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी आपण कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत कसे पोहचले पाहिजे, कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाने देशात जनसामान्य लोकांसाठी राबविलेल्या योजनांंची माहिती कशी द्यावी, अन्य पक्षांतील मतदारांना आपल्याकडे कसे आकर्षित करावे याबाबत भाजप तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत यांनी या वेळी सविस्तर मार्गदर्शन केले.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply