Breaking News

भाजपच्या बाईक रॅलीला प्रतिसाद

सुधागडात युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग

पाली : प्रतिनिधी

सुधागड-पाली येथे रविवारी (दि. 3) भाजप विजयी संकल्प बाईक रॅलीचे आयोजन सुधागड भाजप युवा मोर्चा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.

या भाजप विजयी संकल्प बाईक रॅलीमध्ये सुधागड तालुक्यातील खेड्यापाड्यातील भाजप युवा कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. या रॅलीत दोनशे ते अडीचशे मोटारसायकली सहभागी झाल्या होत्या. भाजप विजयी संकल्प बाईक रॅली पाली येथे आली असता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेण्यात आले. भारतमाता की जय, वंदे मातरम, जय भवानी जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय, अब की बार फिर मोदी सरकार… अशा घोषणांनी संपूर्ण पाली शहरासह तालुका दणाणून गेला होता.

या रॅलीचा आरंभ सुधागड तालुक्यातील शेवटचे गाव अतोणे येथून करण्यात आला, तर या भाजप विजयी संकल्प बाईक रॅलीचा समारोप जांभूळपाडा येथे करण्यात आला. या वेळी भाजप विजयी संकल्प बाईक रॅलीला रायगड जिल्हा चिटणीस राजेश मापारा, युवा मोर्चा अध्यक्ष रोहन दगडे, सुधागड युवा मोर्चा भाऊ कोकरे, सुधागड तालुका सरचिटणीस  शिरीष सकपाल, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रकाश ठोंबरे, चंद्रकांत गोफण, नथुराम सकपाल, अजय खंडागळे, परळी येथील युवा मोर्चा पदाधिकारी केतन देसाई, संदीप ठकोरे यांच्यासह तरुण व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply