Breaking News

आदिवासी महिलांसाठी ‘होपमिरर’चा प्रकल्प

खारघर : रामप्रहर वृत्त

होपमिरर फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने आदिवासी समाजाच्या विकासाठी आणि सुधारण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प सुरू करण्याचा सामाजिक प्रयत्न सुरू केला.

यासाठी होपमिररच्या टीमने खारघर शहराजवळ असलेल्या दोन आदिवासी वाडी घोलवाडी आणि आंबावाडी यांचे सर्वेक्षण केले. यामध्ये येथील महिला वर्गाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी होपमिररची टीम प्रयत्नशील आहे.

घोलवाडी आणि आंबावाडी विभागाचे सर्वेक्षण करण्यात आले ज्यामध्ये व्यवसाय पद्धती, मुलांची शैक्षणिक स्थिती, उत्पन्नाचे स्रोत आणि पायाभूत सुविधा पाहिल्या. होपमिररची टीम या आदिवासी गावांची काळजी घेत असल्याने या आदिवासी गावाला आधुनिक गावात बदलण्यासाठी फाउंडेशननेच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्वेक्षणमध्ये दिसून आले की महिला वर्ग बेरोजगार आहे म्हनून यासाठी प्रोजेक्ट सखी – महिला व्यापार योजना हा प्रकल्प गेल्या दोन महिन्यांपासून फेब्रुवारीमध्ये चालू केले.

ज्या मधे महिला करिता अगरबत्ती बनवायची मशीन विकत घेउन त्याना पूर्ण प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे त्यांना कमावण्याची आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची संधी मिलेल. त्यांचा  उत्पादन बाजारमध्ये सखी अगरबत्ती म्हनून लॉन्च करण्यात आला

सध्या आम्ही दोन आदिवासी गरजू महिलांना रोजगार दिला आहे आणि पुढे जसजस प्रतिसाद भेटेल त्यानुसार आम्ही अजुन महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न करू, असे होपमिरर फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष रमझान शेख यांनी बोलताना सांगितले.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply