पनवेल : रामप्रहर वृत्त
मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल ग्रामीणमध्ये विश्वजीत बारणे आणि जिल्हाप्रमुख तथा आमदार मनोहर भोईर यांनी महायुतीच्या प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. प्रचारफेरी, कोपरा सभा, बैठका घेऊन पनवेल पिंजून काढत आहेत. विश्वजीत बारणे तरुण असल्याने तरुणांचा त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. तरुणांमध्ये त्यांची मोठी ‘क्रेझ’ दिसून येत आहे. घाटाखालील वडिलांच्या प्रचाराची धुरा विश्वजीत यांनी हाती घेतली आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांचा प्रचाराचा धडाका सुरू आहे. पदयात्रा-गाठीभेटी, घेऊन महायुतीच्या उमेदवाराने प्रचारात आघाडी घेतली आहे. खासदार बारणे यांचे सुपुत्र विश्वजीत हे वडिलांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत.
आमदार मनोहर भोईर आणि विश्वजीत बारणे यांनी ग्रामीणमध्ये प्रचारफेरी काढली. या प्रचारफेरीला मोठा प्रतिसाद मिळाला. पनवेल शिवसेना तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शिवसेना-भाजप महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचार रॅलीत सहभागी झाले होते.
संपूर्ण पनवेल ग्रामीणमध्ये आमदार मनोहर भोईर आणि विश्वजीत बारणे यांनी प्रचारफेरी काढली. पनवेल ग्रामीण पिंजून काढले. ग्रामस्थांचा व तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रचारफेरीत तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तरुणांमध्ये दोघांबाबत ‘क्रेझ’ दिसून आली. त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तरुणाईने गर्दी केली होती. ‘शिवसेना-भाजप महायुतीचा विजय असो’, ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’, ‘येऊन येऊन येणार कोण, आप्पाशिवाय आहेच दुसरा कोण’ अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.