Breaking News

अधिक उत्पादन, रोगप्रतिकारक जाती विकसित करण्यावर भर देणार -डॉ. एस. एफ. डिसूजा

कर्जतमध्ये भात संशोधन सभा

कर्जत :  भाताची उत्पादकता वाढविण्यासाठी आता वेगवेगळ्या संशोधन पद्धतीची गरज असून अधिक उत्पादन, रोगप्रतिकारक जाती विकसित करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन भाभा अणुसंशोधन केंद्राच्या अणू विज्ञान संशोधन मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. एफ. डिसूजा यांनी कर्जत येथे केले.

महाराष्ट्र राज्य भात गटाच्या भात संशोधनावरील 53व्या सभेचे आयोजन येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात करण्यात आले होते. त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. शांततेसाठी अणुऊर्जा तंत्रज्ञानाच्या वापराबरोबरच भारताची अन्न सुरक्षितता, अधिक उत्पादन व रोगप्रतिकारक पिकाच्या जाती  विशेषत: तेलबिया व डाळी यासाठी भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्र योगदान देत असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. राज्य भात पीक समन्वयक व सहयोगी संशोधन संचालक डॉ. आर. एल. कुणकेरकर यांनी प्रास्ताविकात नवीन विकसित वाणांविषयी माहिती दिली. भात पैदासकारांनी उत्पादन वाढीसाठी प्रचलित संशोधनाचा विचार न करता बदलत्या हवामानाचा भात उत्पादनावर परिणाम होणार नाही, भात पीक तग धरेल असे गुणधर्म असणार्‍या नवीन जाती निर्माण करणे आवश्यक असल्याचे कोकण कृषी विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख व वनविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मुराद बुरोंडकर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. या वेळी सहयोगी संशोधन संचालक डॉ. पी. व्ही. शेंडे व वनस्पतिशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. ए. के. शिंदे यांची समयोचित भाषणे झाली. विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वनस्पती रोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. ए. पी. सूर्यवंशी, कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आनंद नरंगलकर, विद्यापीठाचे संशोधन उपसंचालक डॉ. एन. बी. गोखले व इगतपुरी कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. डी. व्ही. कुसाळकर, डॉ. बी. के. दास, डॉ. अरुण माने, डॉ. विकास कुमार, डॉ. जी. आर. श्यामकुवर, डॉ. के. सी. क्षीरसागर, डॉ. नरेंद्र काशीद, डॉ. सी. डी. सरवटे, डॉ. बी. डी. वाघमोडे, डॉ. ए. व्ही. गोरे, डॉ. एस. बी. बोरगावकर, डॉ. पी. एस. बेल्हेकर, डॉ. एस. बी. गंगावणे, डॉ. बी. एन. चौधरी, डॉ. व्ही. टी. जाधव, डॉ. व्ही. एन. शेट्ये, प्रा. एम. पी. गवई, एम. एच. केळूस्कर, डॉ. डी. जी. जोंधळे, डॉ. पी. बी. वनवे, प्रा. व्ही. एन. जालगावकर, डॉ. जे. जे. कदम, डॉ. ए. एस. दळवी, प्रा. ए. व्ही. दहिफळे, डॉ. एन. व्ही. म्हसकर यांच्यासह महाराष्ट्रातील भात संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ बहुसंख्येने उपस्थित होते. प्रमुख कृषिविद्यावेत्ता डॉ. एस. बी. भगत यांनी आभार मानले.

भाभा अणू संशोधन केंद्र व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला असून ट्रॉम्बे कर्जत कोलम ही भाताची नवीन जात विकसित करण्यात आली आहे. हा करार दोन्ही संस्थांना एकत्रित काम करण्यास मजबुती देऊन कोकण विभागातील विविध पिकांच्या जातींमध्ये सुधारणा घडवून आणेल.

-डॉ. एस. एफ. डिसूजा, अध्यक्ष, अणू विज्ञान  संशोधन मंडळ

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply