Breaking News

कामोठ्यात मोफत आधार कार्ड शिबिर

आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कामोठे येथील रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित या शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 8) झाले, तर या शिबिराला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली.
या शिबिराच्या उद्घाटनावेळी भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक विकास घरत, गोपीनाथ भगत, दिलीप पाटील, माजी नगरसेविका पुष्पा कुत्तरवडे, संतोषी तुपे, भटके विमुक्त आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष विद्या तामखेडे, ओबीसी सेल अध्यक्ष भाऊ भगत, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भगत, कामोठे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नानासाहेब मगदूम, भाजप महिला मोर्चा सरचिटणीस साधना आचार्य, कामोठे भाजप व्यापार आघाडीचे सहसंयोजक उत्तम जाधव, गुजराती संघाचे अध्यक्ष आशिष पटेल, प्रभाग अध्यक्ष चंद्रकांत कडू, युवा मोर्चा उपाध्यक्ष तेजस जाधव, जयदीप कदम, महिला मोर्चा सरचिटणीस फातिमा आलम, युवा मोर्चा सरचिटणीस नवनाथ भोसले, रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष जयेंद्र जोशी, सचिव आकाश कवडे, कामोठे शहर सरचिटणीस सुशील शर्मा, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, तेजस जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Check Also

आरोग्य योजनांतर्गत करण्यात येणार्‍या उपचारांचे दरपत्रक जाहीर करा

आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची तारांकित प्रश्नाद्वारे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यात आयुष्मान …

Leave a Reply