Tuesday , February 7 2023

फेडरर नाबाद 100

दुबई : वृत्तसंस्था

महान टेनिसपटू रॉजर फेडररने दुबईतील एटीपी टेनिस स्पर्धेत स्टेफॅनो सितसिपासला 6-4, 6-4 असे पराभूत करत आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीतील 100वे एटीपी विजेतेपद पटकावले. 20 वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकणार्‍या 37 वर्षीय फेडररने अमेरिकेच्या जिमी कॉनर्सनंतर 100 विजेतीपदे जिंकणारा टेनिसपटू म्हणून आपला ठसा उमटवला आहे. कॉनर्सच्या खात्यात 109 विजेतीपदे आहेत. याच सितसिपासविरुद्ध ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये फेडररला चौथ्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता.

Check Also

फॉर्म हरवलेला पक्ष

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडण्यापासूनच वादाला तोंड फुटले होते. आता निकाल लागून पाच दिवस …

Leave a Reply