खांदा कॉलनी : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्रासह देश वेगाने प्रगतिपथावर जात आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष प्रज्ञा प्रकोष्ठ सेलच्या वतीने प्रज्ञावंत संवाद कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी (दि. 11) खांदा कॉलनीतील श्रीकृपा हॉलमध्ये करण्यात आले होते. या वेळी भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासोबत प्रज्ञावंतांनी संवाद साधला. पनवेलमध्ये प्रथमच आयोजित या अनोख्या कार्यक्रमात परिसरातील डॉक्टर, वकील, प्राचार्य, शिक्षक, सीए, संशोधक, कंपन्यांचे उच्च पदाधिकारी असे प्रज्ञावंत सहभागी झाले होते. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रज्ञावंतांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. या कार्यक्रमास प्रज्ञा प्रकोष्ठच्या राज्य सहसंयोजिका जयश्री चित्रे, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती ‘ब’चे अध्यक्ष संजय भोपी, पद्मश्री डॉ. शरद काळे, प्रज्ञा प्रकोष्ठचे मुंबई प्रभारी दिलीप गोडांबे, जिल्हा समन्वयक दर्शन प्रभू, पनवेल शहर संयोजक डॉ. मयुरेश जोशी, स्त्रीशक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्ष विजया कदम, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, मनोज भुजबळ, एकनाथ गायकवाड, विजय चिपळेकर, नगरसेविका राजश्री वावेकर, सीता पाटील, कुसुम पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. सिद्धेश्वर गडदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल व आयुष अकुला यांनी केले.