Breaking News

विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या खारघरमध्ये

पनवेल : पनवेल, डोंबिवली, पेण, ऐरोली, बेलापूर मतदारसंघांतील भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा बुधवारी (दि. 16) दुपारी 2 वाजता खारघर येथे होणार आहे. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर, राज्यमंत्री व डोंबिवलीचे उमेदवार रवींद्र चव्हाण, पेणचे उमेदवार रविशेठ पाटील, ऐरोलीचे उमेदवार गणेश नाईक, बेलापूरच्या उमेदवार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा खारघर सेक्टर 29 येथील सेंट्रल पार्कजवळील मैदानावर होणार आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply