
उरण ः प्रतिनिधी
जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. याही वर्षी नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज, रत्नागिरी व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात 54 हजार बाटल्या रक्त जमा करण्याचा संकल्प करून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उरणमध्ये नरेंद्र महाराज यांच्या श्री संप्रदायतर्फे पिरकोन व नवघर, सोनारी, चिरनेर व एनआय हायस्कूल उरण शहर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरांतर्गत पिरकोन येथे 163 रक्त बाटल्या, नवघर येथे 87, सोनारी येथे 77, चिरनेर येथे 110, तर उरण शहरात 270 असे उरणमधून या वर्षी एकूण 707 बाटल्या रक्त जमा करण्यात आला. या रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला असून सुभाष भोसले ब्लड इन नीड तालुकाध्यक्ष, सुरेश पोसतांडेल प्रसिद्धी प्रमुख, पांडुरंग भोईर सातरहाटी सेवा केंद्र अध्यक्ष, श्री संप्रदायाचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ. अरुण भगत, दीपाली पाटील, स्वामी गावंड तालुकाध्यक्ष, नंदाताई बंडा महिला अध्यक्ष, जयेश पाटील, आशीष बंडा, प्रनिल ठाकूर आदी नरेंद्र महाराज सेवा केंद्राचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. नरेंद्राचार्य महाराज संस्थान अंतर्गत ‘ब्लड इन नीड’ ही संकल्पना (उपक्रम) सुरू करण्यात आली असून, या उपक्रमांतर्गत रुग्णाला मोफत रक्त मिळवून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मोफत रक्त मिळविण्यासाठी नागरिकांनी 9619171004 या हेल्पलाईनवर फोन करावे, असे आवाहन ब्लड इन नीडचे तालुकाध्यक्ष सुभाष भोसले
यांनी केले आहे.