पनवेल ः रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल उलवे विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस संपूर्ण भारतात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने विद्यालयात विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन केले होते.
या वेळी विद्यालयातील सेजल मढवी, ऋतुजा साळुंखे, आदित्य खंदारे, वृषाली डोलकर, साक्षी सावंत, ऐश्वर्या कदम आदी विद्यार्थ्यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याची माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केली. विज्ञान शिक्षक व्ही. जी. पाटील यांनी कलाम यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान, तसेच शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची माहिती सांगितली. कार्यक्रमाचे नियोजन एस. आर. गावंड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बी. आर. चौधरी, एस. डी. पाटील यांनी सहकार्य केले. आभार व्ही. व्ही. गावंड यांनी मानले.