Breaking News

‘जिल्हा निवडणूक यंत्रणेचे काम समाधानकारक”

अलिबाग : जिमाका

विधानसभा निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्याची निवडणूक  यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. निवडणुकीसंबंधीची पूर्वतयारी पूर्ण झाल्याने कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी समाधान व्यक्त केले. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या तयारीसंबंधी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी दौंड बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्यश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, स्वीप नोडल अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव व इतर नोडल अधिकारी उपस्थित होते. मतदान केंद्र संख्या व ठिकाणे, वाहतूक व्यवस्था, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट संख्या, कर्मचारी संख्या, सुरक्षा आढावा, मतदार जनजागृती अभियान या सर्व निवडणुकीशी संबंधित बाबींचे नियोजन पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी  यांचे दौंड यांनी कौतुक केले आहे.

जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याबरोबरच स्थिर संनिरीक्षण पथके, भरारी पथके यांचा सक्षमपणे वापर करण्यात येत आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप अंतर्गत व्यापक प्रमाणात मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.

-डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply