Breaking News

करंजा-रेवस तरसेवा सुरू

उरण : वार्ताहर

गेल्या आठवड्यात वादळी पाऊस असल्याने करंजा ते रेवस तर (बोट) सेवा बंद करण्यात आली होती ती सेवा शनिवार (दि. 8) पासून सुरुकरण्यात आली आहे. सरकारी नियमाचे पालन करून हि सेवा सुरु करण्यात  हि सेवा सुरुकरण्यात आली आहे.

रेवस वरून सकाळी 7.15, 8.00, 8.45, 9.30, दुपारी 3 संध्याकाळी 6 वाजता शेवटची बोट असेल. तर करंजा बंदर वरून सकाळी 7.30, 8.25, 9.15, दुपारी 2.30, संध्याकाळी 5.30, 6.30 वाजता शेवटची तर (बोट) सुटेल. तर (बोट) सेवा सुरु झाल्याने उरणहून अलिबाग येथे शासकीय कामे व इतर कामानिमित्त जाणार्‍या प्रवाशांची चांगली सोय झाल्याने प्रवाशी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर (बोट) बंद असल्याने प्रवाश्यांना अलिबाग येथे जाण्यासाठी उरण ते पेण व पेण ते अलिबाग येथे प्रवास करावा लागत असे त्यामुळे वेळेचा अपव्यय व या प्रवासास लागणारा  खर्च (पैसा) जास्त लागत असे तर (बोट) सेवा सुरु झाल्याने पैशाची बचत व वेळेचे अपव्यय दोन्ही वाचले. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणारे प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Check Also

रोजगार महाकुंभला पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पं. दीनदयाळ उपाध्याय …

Leave a Reply