Breaking News

महायुतीच्या प्रचाराचा महाझंझावात, आ. प्रशांत ठाकूर यांना उदंड प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेलचा बुलंद आवाज आणि सर्वांगीण विकास म्हणजे आमदार प्रशांत ठाकूर, हाच नारा पनवेलनगरीत घुमत आहे. विधायक कार्यातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी समाजात मानसन्मान मिळविला असल्याने त्यांच्या प्रचाराला सर्वत्र उदंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

महायुतीचा प्रचारदौरा मंगळवारी (दि. 15) नावडे, पेंधर, कोयनावेळ, घोट, नितळस, खैरणे, ढोंगर्‍याचा पाडा, वावंजे, पाले खुर्द, देवीचा पाडा, कानपोली असा होता. या प्रचारादरम्यान कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्वागतासाठी जनता गावोगावी जमली होती. ठिकठिकाणी त्यांचे औक्षण करण्यात आले, तर ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या लाडक्या नेत्याला भरभरून आशीर्वाद दिले. एकंदर महायुतीचा महाझंझावात दिसून आला.

आमदार प्रशांत ठाकूर शहरांसोबत गावांचा विकास करण्यासाठी तत्पर राहिले. त्यामुळे विकासाचा आलेख उंचावत राहिला. म्हणूनच आमदार प्रशांत ठाकूर यांना विक्रमी मतांनी विजय करण्याचा निश्चय कार्यकर्ते व नागरिकांनी केल्याचे चित्र दिसत आहे. रखरखत्या उन्हातही ‘एकच वादा प्रशांतदादा’चा गजर संपूर्ण प्रचारादरम्यान होत असताना वातावरण प्रफुल्लित व चैतन्यपूर्ण झाले. या प्रचारात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ पाटील, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महापौर डॉ. कविता चौतमोल, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, भाजप नेते वासुदेव पाटील, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, नगरसेवक संतोष भोईर, माजी सरपंच कृष्णा पाटील, धर्मनाथ भोईर, गौरव भोईर, रवींद्र खानावकर, युवा मोर्चाचे महानगरप्रमुख दिनेश खानावकर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply