Breaking News

कांतीलाल कडूंना ‘कफ’चा पाठिंबा नाही! ‘निर्भीड लेख’मधील धादांत खोट्या वृत्ताचा अध्यक्ष मनोहर लिमये यांच्याकडून तीव्र निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त

सिटीझन्स युनिटी फोरम अर्थात कफ या संस्थेचा अपक्ष उमेदवार कांतीलाल कडू यांना पाठिंबा, अशा आशयाचे वृत्त दै. निर्भीड लेखमध्ये मंगळवार, दि. 15 ऑक्टोबर 2019च्या अंकात प्रसिद्ध झाले आहे, मात्र ही बातमी निखालस खोटी, अत्यंत खोडसाळ व आमच्या संस्थेची बदनामी करणारी आहे, असे ‘कफ’चे अध्यक्ष मनोहर लिमये यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे या घटनेचा आणि दैनिकाचा तीव्र शब्दांत निषेध करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘कफ’चे अध्यक्ष मनोहर लिमये यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, कफ ही नोंदणीकृत संस्था पनवेलमध्ये गेली 19 वर्षे नागरी समस्या निवारणार्थ काम करीत आहे. आमची संस्था कोणत्याही विचारधारेशी निगडित नाही. संस्थेचे सर्व निर्णय हे कमिटीच्या मीटिंगमध्ये चर्चा होऊन घेतले जातात. कोणतेही राजकीय भाष्य या मीटिंगमध्ये होत नाही. त्यामुळे दै. निर्भीड लेखमध्ये छापून आलेल्या कफ या सामाजिक संस्थेचा कांतीलाल कडू यांना पाठिंबा, या बातमीत कोणतेही तथ्य नाही. ही बातमी दिशाभूल करणारी असून, लोकांच्या मनात संस्थेबद्दल गैरसमज निर्माण करून संस्था बदनाम करण्याचा हा कट आहे. याचा मी निषेध करतो. लोकांनी या बातमीवर विश्वास न ठेवता जास्तीत जास्त संख्येने घराबाहेर पडून मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहनही शेवटी लिमये यांनी केले आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply