
पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड भारत स्काऊट गाईड आयोजित खरीकमाई उपक्रमांतर्गत चांगू काना ठाकूर मराठी प्राथमिक विद्यालयातील कब बुलबुलमधील विद्यार्थ्यांनी सन 2019मध्ये रायगड जिल्ह्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यांना कब मास्टर प्रवीण पाटील व फ्लॉक लिडर लता मोटे यांनी मार्गदर्शन केले.
संस्थेचे कार्याध्यक्ष, माजी खासदार रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, संस्थेचे सर्व विश्वस्त, संचालक, सचिव डॉ. गडदे, मुख्याध्यापक सुभाष मानकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.