Breaking News

दिघोड्यात शेतीविषयक प्रात्यक्षिके

उरण : रामप्रहर वृत्त

कृषी विभागामार्फत खरीप हंगामामध्ये सुरुवातीस बीज प्रक्रिया मोहीम उरण तालुक्यातील दिघोडे सजामार्फत राबविण्यात येत आहे. बीज प्रक्रिया व भात उगवण क्षमता चाचणी तसेच दहा टक्के रासायनिक खत बचत याविषयी प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्यामध्ये तालुका कृषी अधिकारी जाधव मॅडम, कृषी पर्यवेक्षक व्ही. एस. ढवळ, एन. वाय. घरत व कृषी सहाय्यक व्ही. डी. चव्हाण यांनी शेतकर्‍यांना प्रात्यक्षिक करून दाखवुन मार्गदर्शन केले.

बीज प्रक्रिया केल्यामुळे जमिनितून बियाणेद्वारे पसरणारे रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी करून पिकांची वाढ होण्यासाठी बीज प्रक्रिया कमी खर्चाचे अत्यंत प्रभावी साधन आहे. बियाणे उगवण क्षमता असताना चाचणी ही शेतकर्‍यांनी पेरणी आधी करावी, असे आवाहन केले. कृषी विषयक इतर योजना महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत आंबा, नारळ, फळ बाग लागवडीचा दिघोडे सजेतील शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी सहाय्यक व्ही. डी चव्हाण यांनी केले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply