Breaking News

टेंभोड्यातील शेकाप कार्यकर्त्यांचा प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अनेक पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश करत आहेत. त्याअंतर्गत टेंभोडे येथील शेकाप कार्यकर्त्यांनी मंगळवारी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. सर्व प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले. पनवेल तालुक्यातील टेंभोडे येथील कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या मनमानी कारभाराला कंटाळून पक्षाला राम राम ठोकला आहे. टेंभोडे येथील अनिल पाटील, योगेश पाटील, गणेश पाटील, वासुदेव पाटील, सुनील पाटील, स्वप्नील फुंगडे, श्रीकांत फुंगडे, स्वप्नील घरत, विजय पाटील, नाथा पाटील, मदन पाटील, शामा पाटील, कविता पाटील, सपना पाटील, मानसी पाटील यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशाच्या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, भाजप नेते बाबा नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply