पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाची गळती सुरूच असल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते विकासाचे कमळ हाती घेताना दिसत आहेत. त्याअंतर्गत तक्का येथील शेकापच्या अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. या वेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी पक्षाची शाल देऊन प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. तक्का येथे झालेल्या या पक्षप्रवेशाच्या वेळी शेकापचे राजू देडे, पार्वती देडे, चिंतामण ओहळ, मथुराबाई ओहळ, सुखदेव मोरे, तारा मोरे, राजेश घाटे, वैशाली घाटे, उज्ज्वला बोकडे, नवनाथ बोकडे, रघुनाथ बोकडे, पोपट मुंगसे, महादेव गीरे, राम पानखडे यांच्यासह अनेकांनी जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक अजय बहिरा, भाजपचे प्रभाग क्रमांक 20चे अध्यक्ष मनोहर मुंबईकर, सागर बहिरा यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.