Breaking News

‘उरण सरस’ महोत्सवाची सांगता

उरण ः वार्ताहर

श्री समर्थ कृपा स्वयंसाहाय्यता संस्था उरण यांनी ओएनजीसी यांच्यामार्फत उरणमध्ये प्रथमच उरण महिला बचत गटांसाठी आयोजित उरण सरस उरण महोत्सव आयोजित केला होता. तीन दिवसांच्या या महोत्सवात श्री समर्थ कृपा सखी संस्थेच्या अध्यक्षा संगीता ढेरे, तसेच उपाध्यक्षा वैदेही वैवडे, खजिनदार मंजू कुमार, सचिव कविता म्हात्रे, वैशाली पाटील, सुप्रिया सरफरे, शिल्पा शेडगे, रूपाली गिधे, मीना रावले, अभया म्हात्रे, सारिका भोईर व इतर सहकारी यांनी खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम अतिशय उत्तमप्रकारे पार पाडला. या तीन दिवसांमध्ये विविध प्रकारचे खेळ महिलांच्या करमणुकीसाठी घेण्यात आले. त्यामध्ये संगीत खुर्ची, पाककला स्पर्धा, होम मिनिस्टर स्पर्धा या देखील घेण्यात आल्या. एकूण 30 स्टॉल होते. यासाठी आर्थिक सहाय्य ओएनजीसी व सर्व संस्थांच्या सदस्यांनी मिळून केले. पहिल्या दिवशी ओएनजीसीचे सर्व पदाधिकारी यांनी दीपप्रज्वलन करून महोत्सवाची सुरुवात केली. रमेश नाईक त्यांच्या उत्तम भाषणाने मोलाचे मार्गदर्शन महिलांना मिळाले. दुसर्‍या दिवशी सिंधुताई सपकाळ यांनी महिलांसाठी त्यांचे मोलाचे विचार व आपल्या जीवनविषयक माहिती दिली आणि महिलांनी काय करायला हवे, महिलांनी आपल्यासाठी कसे जगायला हवे, हे त्यांनी सर्व महिलांना त्यांच्या भाषणातून सांगितले, तसेच उपजिल्हाधिकारी अश्विनी पाटील व सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी मतदानाची जनजागृती करण्यासाठी सर्वांना शपथ दिली. सूत्रसंचालनाचे काम नीलेश कोरलेकर व आरती म्हात्रे यांनी केले. सचिन ढेरे, उमेश वैवडे, राजेश सरफरे, निकेतन पाटील, राकेश कुमार यांचे विशेष सहकार्य लाभले.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply