प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारात शिवसेनेचा पुढाकार
पनवेल ः वार्ताहर
पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ शिवसैनिक आता आदिवासी, ठाकूरवाड्या, वस्त्यांवर जाऊन प्रचार करीत आहेत. कोणत्याही परिस्थितीत महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य देऊन विजयी करण्याचा निर्धारच शिवसैनिकांनी केला आहे.
पनवेल परिसरातील अनेक आदिवासी वाड्या, ठाकूरवाड्या तसेच वस्त्यांवर शिवसेना पनवेल तालुका उपमहानगर संघटक गुरुनाथ पाटील व इतर आपले सहकारी व पदाधिकार्यांना घेऊन प्रचारार्थ जात असून त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांचा वचननामा, त्यांचा कार्यअहवाल व त्यांनी केलेली विकासकामे याची माहिती आदिवासी बांधवांना देत आहेत, तसेच त्यांच्या अडीअडचणी सुद्धा या प्रचाराच्या निमित्ताने जाणून घेत आहेत.
यानिमित्ताने एक जोरदार शक्तिप्रदर्शन महायुतीकडून करण्यात येत आहे. त्यांनी चांगलीच प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.