उरण : महाशिवरात्री सोमवारी (दि. 4)असल्याने उरण तालुक्यातील सोनारी गावाजवळील स्पीडी सीएफएससमोर उंचावर सुंदर फदलेश्वर शंकर मंदिर असून सोनारी गावचे कृष्णा हरी तांडेल, महादेव हरी तांडेल व शंकरशेठ हरी तांडेल यांनी ते बांधले आहे. गेली 25 वर्षांपासून दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त सात दिवस अगोदर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सदर मंदिर हे पुरातन काळातील आहे, असे भक्तांनी सांगितले. 25 फेब्रुवारी ते 4 मार्चपर्यंत काशीखंड अखंड पारायण ठेवण्यात आले आहे. हभप रामचंद्र जगन्नाथ म्हात्रे व हरेश्वर पाटील हे वाचन करीत आहेत. या कालावधीत हरिपाठ, कीर्तन, भजन, अन्नदान, वस्त्रदान करण्यात येते. महाशिवरात्रीला भक्तांची दर्शनासाठी खूप गर्दी असते. 30 वर्षांपूर्वी सोनारी गावचे प्रसिध्द उद्योजक शंकरशेठ तांडेल हे शंकर मंदिराजवळ शाळेचा अभ्यास करावयास जायचे. त्यांनी पुरातन काळातील छोटेसे शंकर मंदिर पाहिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी सन 1906 साली फदलेश्वर हे मोठे शंकर मंदिर बांधले. भक्तगण मोठ्या संख्येने महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी येत असतात. श्रावणी सोमवार, महाशिवरात्री व दर सोमवारी दर्शनासाठी भक्तगण येत असतात. महाशिवरात्रीच्या सात दिवस अगोदर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अखंडपणे 23 वर्षे सतत गोरगरिबांना वस्त्रदान, अन्नदान केले जाते, असे मंदिराचे मालक शंकरशेठ तांडेल यांनी सांगितले.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …