Breaking News

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन

खारघर : खारघर येथील रामशेठ ठाकूर महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मॉडल मेकिंग स्पर्धा, वैज्ञानिक रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या गेल्या.  विज्ञान विभागातर्फे विज्ञानावर आधारित मासिकाचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य  डॉ. एस. के. पाटील, प्राचार्य डॉ. एस.टी. गडदे तसेच विभागप्रमुख प्रा. स्मिता राऊत,  शिक्षकवृंद व विद्यार्थीवर्ग यांच्या उपस्थितीत करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एस. के. पाटील यांनी  विज्ञाान दिनानिमित्त थीमवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी आपला वैज्ञानिक दृष्टिकोन कसा विकसित केला पाहिजे याची माहिती दिली.प्राचार्य डॉ. एस. टी. गडदे यांनी मॉडल मेकिंग स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून सर्व विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य  शरदकुमार शहा  यांचे मार्गदर्शन लाभले. चेअरमन लोकनेते  रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख यांनी सर्वांचे कौतुक केले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply