पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे कोपर अध्यक्ष सुधीर ठाकूर, गव्हाणचे उपसरपंच विजय घरत यांच्या प्रयत्नांमुळे 144 कामगारांना पगारवाढ आणि बोनस मिळाला आहे. त्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सुधीर ठाकूर व विजय घरत यांच्यासह कामगारांनी आभार मानले आहे. न्हावा-शिवडी सी लिंकचे काम सुरू असून या ठिकाणी एम पॉवर या कंपनीमार्फत सिक्युरीटी गार्ड आणि हाऊस किपींगसाठी कामगार पुरवले जातात, मात्र गेल्या दोन वर्षांपासून या कामगारांची पगारवाढ तसेच इतर सुविधा दिल्या जात नव्हत्या. या संदर्भात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच विजय घरत आणि कोपर अध्यक्ष सुधीर ठाकूर यांनी पाठपुरवठा करून या कंपनीतील 144 कामगारांना न्याय मिळवून दिला. याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कामगारांनी आभार मानले. या वेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, ज्येष्ठ नेते वसंतशेठ पाटील, कोपर अध्यक्ष सुधीर ठाकूर, आशिष घरत, मयुर घरत, प्रफुल घरत, आकाश ठाकूर, किरण कडू, विश्वास कोळी, अक्षय कोळी आदी उपस्थित होते.