Tuesday , March 28 2023
Breaking News

महायुतीच्या प्रचाराचा ग्रामीण भागात जोर; दिघाटी व केळवणे गावात प्रचार रॅली, कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग

पनवेल : रामप्रहर वृत्त

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रचाराने पनवेल तालुक्याचा ग्रामीण भाग ढवळून निघाला असून, रविवारी दिघाटी, केळवणे गावात जोरदार प्रचार करून मतदारांशी संवाद साधण्यात आला.  माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर अणि जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली दिघाटी व केळवणे येथील प्रचार रॅली काढून मतदारांशी थेट संपर्क साधून बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत. त्यास मतदारांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्या अनुषंगाने रविवारी केळवणे, दिघाटी परिसरात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार करताना शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अशोक थोरवे, दिघाटी सरपंच अमित पाटील व केळवणे सरपंच अश्विनी घरत, मा. उपसरपंच मंगेश वाकडीकर, शिवसेनेचे डॉ. भरत घरत, केळवणचे उपसरपंच भानुदास गावंड, दिघाटी ग्रामपंचायत सदस्य रोहिदास शेडगे, दिघाटी ग्रामपंचायत सदस्या स्मिता  ठाकूर, भाजप बुथ कमिटी सदस्य सुबोध ठाकूर, केळवणे ग्रामपंचायत सदस्या उज्ज्वला ठाकूर, केळवणे ग्रामपंचायत सदस्य सुशील ठाकूर, पांडुरंग म्हात्रे, शर्मिला माळी, जयश्री कोळी, राजेंद्र ठाकूर, मारुती मोकल, सीता ठाकूर, रेश्मा गावंड, मुक्ताबाई माळी, नारायण  ठाकूर, मच्छिंद्र पाटील, शाम पाटील, कैलास पाटील, राकेश पाटील, सचिन पाटील, नितेश शेडगे, प्रशांत  ठाकूर, सागर ठाकूर, विकास पाटील, अनिकेत पाटील, नरेंद्र पाटील, सुधाकर ठाकूर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

पळस्पे ते इंदापूर मार्ग काँक्रिटीकरणाचे गुरुवारी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई व विशेषत्वाने कोकणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पळस्पे ते इंदापूर महामार्गातील रस्त्याच्या …

Leave a Reply