Breaking News

माथेरानमध्ये महायुतीची प्रचार रॅली

कर्जत : प्रतिनिधी

विधानसभेचे कर्जत मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचारार्थ माथेरानमध्ये शनिवारी (दि. 19) पदयात्रा रॅली काढण्यात आली होती. शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख प्रसाद सावंत व शहराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार पावसात काढण्यात आलेल्या या रॅलीत शिवसेना, भाजप, आरपीआय, रासप व रयत क्रांती महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माथेरानमधील मुस्लिम मोहल्ला, संत रोहिदासनगर,

वाल्मिकनगर, पंचवटीनगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर, हुतात्मा भाई कोतवाल नगर, माथेरान बाजारपेठ मार्गे फिरविण्यात आलेल्या या रॅलीची सांगता श्रीराम मंदिर चौकात करण्यात आली. तेथे झालेल्या सभेत नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, प्रसाद सावंत, जनार्दन पार्टे, हेमंत बिरामणे, कुलदीप जाधव, अनिल गायकवाड यांनी महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांनी आभार मानले.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply