Breaking News

पनवेल महापालिकेच्या शाळा झाल्या डिजिटल!

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते क्लासरूमचे उद्घाटन

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेच्या वतीने सर्व शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. लोकनेते दि.बा.पाटील शाळेमध्ये डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 6) करण्यात आले.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेच्या शाळा डिजिटल झाल्याने येणार्‍या काळात महापालिकेचे विद्यार्थीही विविध स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवतील, खासगी शाळांनाही त्यांची दखल घ्यावी लागेल. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे सर्व प्रशासनातील अधिकारी व शिक्षक उत्तम पद्धतीने काम काम करीत असल्याने येणार्‍या काळात पनवेल महापालिका शिक्षणाच्या बाबतीत अव्वल ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमास आयुक्त गणेश देशमुख, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगरसेवक नितीन पाटील, अतिरिक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त गणेश शेटे, कैलास गावडे, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, शिक्षण विभाग प्रमुख किर्ती महाजन, सन सिस्टम कंपनीचे लक्ष्मण वायकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोदी शाळा क्रमांक 8 येथील मुख्याध्यापिका अश्विनी भोईर यांना आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तसेच येथून पुढे दरवर्षी महापालिकेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी घोषित केले.

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply